महाविद्यालयीन तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून अभ्यास करावा - प्राचार्य डॉ. सुनिल पवार

0
महाविद्यालयीन तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून अभ्यास करावा - प्राचार्य डॉ. सुनिल पवार

कळंब:- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा  २७  वा नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.   
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी विविध आदर्श बाळगणे आवश्यक आहे. समाजजीवनाच्या कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हे लक्षात घेवून ध्येय निश्चित  करावे.   त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करून जीवनात यशस्वी व्हावे.
त्याप्रसंगी  प्राचार्य डॉ. सुनिल पवार बोलत होते. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव आदरणीय डॉ.अशोकदादा मोहेकर , उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे,उपप्राचार्य प्रा. आर.एन. गोरमाळी डॉ.संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मराठी विभागातील प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी  विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त नामविस्ताराचा लढा, त्याचे तत्कालिन
स्वरूप आणि  संक्षिप्त इतिहास याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. एम.डी. गायकवाड , डॉ. भरत गपाट, डॉ.दत्ता साकोळे, डॉ. के.डी. जाधव, प्रा.ईश्र्वर राठोड, डॉ. आर. व्ही. ताटीपामुल, प्रा. डॉ. संदीप महाजन, प्रा.पवार,  प्रा.दिलीप पाटील, प्रा. अरविंद खांडके, श्री अरविंद शिंदे, श्री संतोष मोरे, श्री हनुमंत शिंदे  तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top