तुळजापूर - चोरीच्या मोटारसायकल सह आरोपी पोलीसांच्या ताब्यात
तुळजापूर : सुरेंद्र गणेश सातपोते, रा. सोलापूर यांनी आपली होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 13 सीव्ही 8860 ही दि. 28.12.2020 रोजी 11.00 वा. सु. पंचायत समिती, तुळजापूर समोर लावली असता अज्ञाताने चोरली होती. यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 15 / 2021 हा 379 नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात तुळाजापूर पो.ठा. चे पोनि- श्री मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- पवार, पोहेकॉ- तानाजी माळी, शिंदे, पोकॉ- अमोल पवार यांच्या पथकाने धनेगाव, ता. तुळजापूर येथील रहिवासी- सुनिल हुलपा भोसले, वय 42 वर्षे यास दि. 15.01.2021 रोजी धनेगाव शिवारातून चोरीच्या नमूद मोटारसायकलसह अटक केली आहे.