उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

0


 उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल 

* पोलीस ठाणे, उमरगा: रवी राम जोगदंड, रा. कराटळी, ता. उमरगा हे गावकरी- गोविंद वडदरे यांच्या कराळी शिवारातील शेतात दि. 15.01.2021 रोजी 13.00 वा. सु. स्वत:च्या शेळ्या चारत होते. यावेळी शेतमालक- गोविंद वडदरे यांनी तेथे येउन शेतात शेळ्या चारत असल्याच्या कारणावरुन रवी जोगदंड यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रवी जोगदंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

* पोलीस ठाणे, परंडा: 1)केदार पाटील 2)संदीप पाटील 3)बालाजी पाटील 4)सुरज पाटील 5)प्रदिप पाटील 6)लक्ष्मण पाटील 7)प्रशांत पाटील 8)बद्री पाटील 9)अजय नवले 10)मंगेश चोबे 11)सुनिल चोबे 12)आकाश नवले 13)विजयसिंह चोबे 14)नवनाथ चोबे 15)संतोष पाटील, सर्व रा. शिरसाव, ता. परंडा यांनी दि. 15.01.2021 रोजी 16.00 वा. गावातील अंगणवाडी क्र. 59 समोरील जागेत राजकीय वैमनस्येतून बेकायदेशीर जमाव जमवून आपापसात शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. यात गावकरी- अनिता युवराज मिसाळ व शिवाजी बिरमल बोबडे यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या सिरसाव चे पोलीस पाटील- श्री हरीश्चंद्र लिंबाजी पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 15 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 337, 323, 188, 171 (क), 504 आणि म.पो.का. कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

* पोलीस ठाणे, बेंबळी: दादा हिराजी रसाळ, रा. खंडोबा गल्ली, बेंबळी, ता. उस्मानाबाद हे काल दि. 15.01.2021 रोजी 12.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर बसले असतांना गल्लीतीलच शुभम अनिल नकाते यांनी तेथे येउन राजकीय वैमनस्यातून दादा रसाळ यांना शिवीगाळ करुन विट डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या दादा रसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top