Osmanabad येथील कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा ..

0

उस्मानाबाद येथील कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा ..

उस्मानाबाद :-  १४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान साजरा करण्यात येणारा ' मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ' याचे निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदरचे कार्यक्रमास श्रीमती . ए . ए . शिंदे , न्यायाधीश , कौटुंबिक न्यायालय ,. एस . बी . तोडकर , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , राजेंद्र अत्रे , जेष्ठ मराठी साहित्यीक व चित्रकार , कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी , विधिज्ञ व पक्षकार असे ३० जणांची यावेळी उपस्थिती  होती.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  ए .ए .शिंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाची प्रस्तावना विजयकुमार गव्हाने यांनी केली . त्यानंतर प्रा. राजेंद्र अत्रे यांनी मराठी भाषेवर उपस्थितांना व्याख्यान दिले . त्यांनी त्यांचे मार्गदर्शनात मराठी ही माणसाच्या अत्यंत जवळची भाषा असल्यामुळे न्यायालयीन कामकाज व प्रशासकीय कामकाज जर मराठीतून झाले तर लोकांना ते अत्यंत सोयीचे होईल . केवळ इंग्रजी न बोलता आल्यामुळे किंवा इंग्रजी न समजल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात . पण इतर कोणत्याही भाषेचा द्वेष न करता राजभाषा म्हणून मराठीचा वापर करणे ही काळाची गरज झालेली आहे असे सांगितले . तसेच त्यांनी त्यांचे मार्गदर्शनामध्ये वि . वा . शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांच्या दोन कवितांचे वाचन व आशय सांगितला . त्यानंतर एस . बी . तोडकर म्हणाले न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर याबाबत असणारे शासन निर्णय , महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम १९६४ च्या तरतुदी उपस्थितांच्या निर्दशनास आणुन दिल्या . तसेच या पंधरवाडा निमित्त शासकिय कार्यालये , शाळा , महाविद्यालय येथे कथाकथन , वकृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा , ग्रंथदिंडी , पुस्तक प्रकाशने , चर्चासत्रे या कार्यक्रमाचे आयोजन करुन मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमुद केले . तसेच मराठी ही आपली मायबोली आहे , तिचे जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे , न्यायालयात रोजनामे लिहीतांना , साक्षी नोंदवितांना आदेश व न्यायनिर्णय पारित करतेवेळी मराठी भाषेचा वापर केल्यास पक्षकारांना प्रकरणांची कार्यवाही समजण्यास , आवश्यक ते पाउल उचलण्यास व काय निर्णय झाले हे समजण्यास मदत होईल असे नमुद केले . त्यानंतर एस . एस . शिंदे मॅडम यांनी उस्मानाबाद येथे संपूर्ण कामकाज मराठी भाषेत केले जात असून त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला , पक्षकारांना नक्कीच होत आहे व यापुढेही मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जाईल असेही नमुद केले व उपस्थितांचे आभार  मानले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विधिज्ञ . एम . बी . माढेकर यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top