तूझ्यामुळेच माई मी आज तीन डॉक्टरांची आई - लेख

0
लेख....

तूझ्यामुळेच माई मी आज तीन डॉक्टरांची आई ..

श्रीमती सुवर्णा रामचंद्र शिंगे... 
लिहितात...

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई तुझ्या जयंतिनिमित्य मी तूला कोटी कोटी नमन करते........माई माझा जन्म तसा खेडेगावातला . आईने तर चूल नी मूलच  केल, पण माझ्या वडिलांनी तूझा आदर्श घेऊन मला शाळेत घातल .ते सतत म्हणायचे माई सावित्रीचा वसा तूम्हा मुलींना पुढे न्यायचा आहे  आणि मग मी शाळेत जाऊ लागले,तूला वाचू लागले ,तूला समजून घेऊ लागले तेव्हा मनाने पक्के ठरवले की माईसारखे आपण शिक्षिका व्हायचे .तू तर प्रवाहाच्या विरूध्द जाऊन स्त्रिशिक्षणाची क्रांतीज्योत प्रज्वलीत केलीस ,असंख्य हाल अपेष्टा सहन करून आम्हा स्त्रियांना शिक्षणाची दारे खूली करून दिलीस ,परंपरेची ओझी झूगारून तू आमच्या पायातल्या बेड़या सोडवूनआत्मभानाची भरारी घेण्याच बळ दिलस त्याच बळावर मी दहावीनंतर डी .एड .करून शिक्षका झालेआणि तूझ कार्य पूढे नेत असतानाखूप पिढया चांगल्या पध्दतीने घडविल्यानंतर तसेच अनेक मुलिंना शिक्षणाच्या प्रवाहातआणले.......माईतू जर नसती ना आजही आम्हास पारतंत्र्यात व चाकोरीबद्ध असच जीण जगाव लागल असत .....माई तू यशवंताला चांगले संस्कार ,शिक्षण देऊन जसे डॉक्टर केले तसाच माझाही प्रयत्न राहिला ,शाळेतील मुलांना चांगले शिक्षण देत असतानाच मी माझ्या स्वतःच्या मुलां कडेही दुर्लक्ष केले नाही त्यामुळेच तर माझी दोन मुले व एक मुलगी आज MBBS च शिक्षण चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये घेत आहेत .माई हे करत असतानाखूप कसरत व्हायची ग पणतूझ्या स्वप्नातील स्त्री मला साकारायची होती म्हनून हा सगळा प्रयत्न .....माई मी एवढ ठामपणे सांगु शकते की एक मुलगी (स्त्री ) काय करू शकते ?तर ती दोन्ही घरी प्रकाश देऊ शकते ,आणि जर एक मुलगी शिकली तर ती आपले घर ,कुटुंब ,समाज यासाठी कशी उपयोगी पडते हे माझेच उदाहरण मी देते .....आज जे म्हनतात ना मुलगा वंशाचा दिवा पण मुलगी तर सासर व माहेरघरचा सक्षम दीपस्तंभ आहे सतत तेवत राहणारा .....माई तूच आम्हा स्त्रियांचा उध्दार केलास .माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलास ,आधूनिक भारतीय स्त्रि शिक्षणाचा पाया तूच रचलास ,माई आम्हा स्त्रियांच्या आयुष्यात सुंदर व विविध रंग भरण्याचे महान कार्य तूच केलेस.आमच्या पंखात भरारी घेण्याच बळ फक्त माई तुझ्यामुळेच ......माई तूझ कार्य तर आभाळाईतक मोठ आहे आम्ही तूझी बरोबरी तर करू शकणार नाही पण तूझ्या स्वप्नातील स्त्रीयाविषयीचे विचार आचरनात आणताना मी आजच्या या तूझ्या जयंतीदिनी ,शुभदिनी एवढच सांगू शकते की तू सर्व विश्वाची ,आम्हा समस्त स्त्रीयांची सावित्रीमाता झालीस पण मी माझ्या कार्यक्षेत्राची व माझ्या घराची सावित्रीमाता होऊ शकले याचा मला सार्थ अभिमान आहे  यात ज्योतिबांसारखी पतीची साथ मिळाली हेही विशेष ....माई तूझा वसा आम्हा स्त्रीयांना असाच पुढे न्यायचा आहे यासाठी मी आणखीही खूप खूप प्रयत्नकरणार आहे असे वचन मी तूला आजच्या याशुभ दिनी देते .......जाता जाता मी एवढच म्हणेन " नको मज मथुरा अन् काशी माई सारे तिर्थ माझे तूझ्या चरणापाशी !"  .......जय हिंद जयसावित्रीमाई !



श्रीमती सुवर्णा रामचंद्र शिंगे - सुर्यवंशी 
प्राथमिक पद्विधर जि.प.प्रा .शा .खानापूर 
ता .जि .उस्मानाबाद  मो.  9421446147 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top