उस्मानाबाद तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा!
उस्मानाबाद: उस्मानाबाद तालुक्यातील एकूण ६६ ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पार्टी प्रणीत पॅनलने ४१ ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. असा दावा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला आहे. आमदार राणा पाटील यांनी एका सोशल मीडिया पोस्ट द्वारे हा दावा केला आहे. यात भानसगाव, सोनेगाव, दाऊतपूर, बेगडा, सांगवी, नांदुर्गा, बोरखेडा, भंडारी, खामगाव, गौडगाव, खामसवाडी, पाटोदा, अनसुर्डा, काजळा, तावरजखेडा, बेंबळी, बोरगावराजे, घाटंग्री, ताकविकी, भांडारवाडी, गावसुद, मेडसिंगा, महादेववाडी/विठ्ठलवाडी, लासोना, सुभा, नितळी, घुगी, गडदेवधरी, मुळेवाडी, रुई ढोकी, वरवंटी, राजुरी, टाकळी ढोकी, बरमगाव, रामवाडी, आळणी, कौडगाव बावी, सकनेवाडी व त्याचबरोबर बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत पोहनेर, धुत्ता व डकवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीनिशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत प्रचार केला. तसेच सर्व मतदार बंधूनी विश्वास दाखवत भाजप प्रणित पॅनलला मतदान केले त्या बद्दल त्यांनी आभार देखील मानले.