पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.चौधरी यांचा सत्कार - PHD

0
पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.चौधरी यांचा सत्कार

उस्मानाबाद / कळंब : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील गणित विषयाचे प्रा. डॉ. एच.एल. चौधरी यांना सरदार पटेल विद्यालय बालाघाट, मध्यप्रदेश. येथील विद्यापीठात गणित विषयाचे पीएचडी  प्रबंध परीक्षक म्हणून निवड झाली तसेच पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे त्याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ .अशोकराव मोहेकर यांनी अभिनंदन केले तसेच मोहेकर महाविद्यालय मध्ये 

त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.एन.लोमटे, प्रा आर.एन.गोरमाळी, गणित विभाग प्रमुख प्रा. संजय मिटकरी हे होते तर प्रा .अनिल फाटक ,प्रा .बी.एन.राऊत यांनी मनोगत व्यक्त केले व प्रा अरविंद खांडगे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय ,विद्यार्थ्यांमध्ये व परिसरामध्ये कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top