कर्ज पुरवठा करणाऱ्या अनाधिकृत ॲप्सविरुध्द :
आरबीआयकडून सावधानतेचा इशारा !
उस्मानाबाद,दि.16 ( प्रतिनिधी ) :- जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंचाना, मोबाईल ॲप्सना व्यक्ती व छोटे उद्योग वाढत्या प्रमाणात बळी पडत आहेत. या रिपोर्टमध्ये कर्जदाराकडून अत्याधुनिक व्याजदर व छुपे आकार मागण्यात येत आहेत. शिवाय कर्जवसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाही पध्दतीने अनुसरण यात येत असल्याचे आणि कर्जदारांच्या मोबाइल फोनवरील डेटा मिळवण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरबीआयकडे पंजीकृत केल्या गेलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियम सारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडून विनीमियत केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकर्ती करु शकतात.
जनतेला येथे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जनतेने अशा बेकायदेशीर कार्यकर्त्यांना बळी पडू नये आणि ऑनलाईन मोबाईल ॲप्स द्वारा कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या संस्थांचा खरेपणा म्हणजेच पूर्व इतिहास पडताळून पाहावा. शिवाय ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती तसेच अनधिकृत ॲप्स बरोबर कधीही शेअर करु नयेत. असे ॲप्स संबंधित बँक खात्यांची माहिती संबंधित कायदा अंमलबजावणी एजन्सींना कळवावी. किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा https://sachet.rbi.org.in उपयोग करावा. आरबीआयकडून विनिमियत करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुध्दच्या तक्रारी दाखल करण्यासाठी पोर्टल मार्फत एक्सेस केले जाऊ शकते, असे भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दायाल यांनी कळविले आहे.
****