कोव्हिड-19 मध्ये कोरोना योध्दा म्हणुन आरोग्य विभागात काम केलेल्या कामाचा मोबदला मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
कोव्हिड-19 मध्ये कोरोना योध्दा म्हणुन आरोग्य विभागात जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाचा मोबदला मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद :- सुशिक्षित बेरोजगारांनी कोव्हिड -19 (कोरोना) संकटाच्या समयी नगर पालिका स्वच्छता व आरोग्य विभागात जीवाची पर्वा न करता शासनाच्या अधिपत्याखाली कंत्राटी पद्धतीने काम केले,कोव्हिड मुळे मृत्यु पावलेल्या रुग्णांचे अंत्यविधी केले,ठिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करुन शहरातील परिस्थिती कोरोना रोगांपासून नियंत्रित ठेवण्यासाठी जीव मुठीत घेऊन रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी प्रयत्न केले.परंतु याचे मानधन अद्यापही पुर्णपणे त्यांना  मिळाले नाही.गरज राहिल वास्तवेला वास्तवतेची प्रमाणे बेरोजगार त्यात कोरोनाचे संकट,लाॅकडाऊनच्या काळात कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणुन मिळालेल्या कंत्राटी कामाची संधी न सोडता समोर मृत्यू उभा दिसत असतानाही त्यांनी काम केले.वेळ संपली गरज नाही म्हणुन कामावरुन काढुन टाकले,राहिलेल्या मानधनासाठी परत परत आपल्याकडे विनंती करीत आहोत..
मा.साहेबांना विनंती की आम्हा कंत्राटी फवारणी कामगारांचे सहा,आठ महिण्याचे राहिलेले मानधन देण्याची व्यवस्था करुन रोजगार उपलब्ध करून उपजीविका भागविण्यासाठी मदत करावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यात स्वराज जानराव, रामचंद्र करवर,जलील शेख,अक्षय गोरवे,अरबाज पठाण, रमाकांत करवर अन्य इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top