भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आवाहन
औरंगाबाद,दि.11 (विमाका):- केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या सिव्हील सर्व्हीस 2021 चे पूर्व तयारी करीता राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण,केंद्र औरंगाबाद,नाशिक,कोल्हापूर,मुं
वरील सहा केंद्र महाराष्ट्र राज्याच्या उच्च् व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालविले जात असून यामध्ये पात्र उमेदवारांना निशु:ल्क प्रशिक्षण देण्यात येते.महाराष्ट्रातील युवक, युवतीनां देश पातळीवरील IAS, IPS, IFS इ.केंद्रीय सेवामध्ये प्रवेशित होता यावे या हेतूने शासनाकडून सदर केंद्र चालविण्यात येतात.या केंद्रामार्फत प्रवेशित उमदेवारांना युपीएससी पूर्व,मुख्य व तोंडी परीक्षा या प्रमाणे शासन खर्चाने टप्याटप्याने तयारी करून घेण्यात येते.