सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणे, चालवणे, वाहतूक करणाऱ्या 4 चालकांवर गुन्हे दाखल.”

0


सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणे, चालवणे, वाहतूक करणाऱ्या 4 चालकांवर गुन्हे दाखल.

Osmanabad जिल्हा: सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहन उभी करणाऱ्या- चालवणाऱ्या व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहनांत मालवाहून नेणाऱ्या 4 चालकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283, 279 अंतर्गत खालीलप्रमाणे 4 गुन्हे 25 फेब्रुवारी रोजी नोदवण्यात आले.

चालक- समाधान चव्हाण, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 5949 ही येडशी बसस्थानक चौकात निष्काळजीपणे, हयगईने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याने उस्मानाबाद (ग्रा.) येथे गुन्हा नोंदवण्यात आला.

 

चालक- महादेव गायकवाड, रा. माळेगाव, ता. केज यांनी आपले पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 एजे 8778 हे ढोकी पेट्रोलपंप चौकातील रस्त्यावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने ढोकी येथे गुन्हा नोंदवण्यात आला.

 

चालक- 1)गणेश पुरी, रा. खडकी, ता. कळंब 2)प्रफुल्ल ठोंबरे, रा. कळंब हे दोघे आपापल्या ताब्यातील अनुक्रमे टाटा मॅजीक क्र. एम.एच. 25 पी 3382 व पॅगो रिक्षा क्र. एम.एच. 23 पी 3698 च्या बाहेर आलेल्या अवस्थेत लोखंडी सळयांची  शहरातील होळकर चौकातून वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने कळंब येथे गुन्हा नोंदवण्यात आला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top