परंडा प्रतिनिधी-
(श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम)
श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी व शंभुसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त कपिलापुरी येथे अत्यंत साधेपणाने शिवमूर्ती स्थापना व पूजन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा खर्च न करता कोरोना संसर्गचे वाढते प्रमाण पाहता प्रतिष्ठाणने जागतिक महामारी कोरोना संसर्ग विषयक माहिती पत्रक व पोस्टरर्स वाटप करून जनजागृती करण्यात आली.तसेच श्रीराम मंदिर निधी संकलन कार्य देखील पूर्ण करण्यात आले.
शिवजयंतीचे अवचित्य साधून ग्रामपंचायत कपिलापुरी नूतन सरपंच श्री. बाळासाहेब मोहनराव आवाने यांचा सत्कार करण्यात आले.शिवजयंती आनंद साजरा करत मिठाई वाटप करण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, सोशल डिस्टंगसिंग व सॅनिटायझर वापर याबाबत माहिती सांगण्यात आली.
याप्रसंगी जि. प.प्रा.शाळा कपिलापुरी मुख्याध्यापक श्री.कुलकर्णी,सहशिक्षक गरड,रणजित जैन,शिवाजी पाटील,गुणपाल जैन,नितीन शिंदे, ,संतोष जैन,बाहुबली मसलकर,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा शंभुसेना महाराष्ट्र राज्य ,जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील उपस्थित होते.
श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी ही सामाजिक संस्था नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार ) यांच्याशी संलग्नित राहून समाजहित कार्य करत आहे.