पिक विमा भरण्यासाठी जाचक अटी रद्द करा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे २०२०-२१ साली खरीप पिक विमा
योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी विमा संरक्षित केला आहे. खरीप हंगामात नुकसान झाले असेल तर ७२ तासांच्या आत विमा
कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. अशी जाचक अट विमा कंपनी ने घातली बसेच शेतकरी या जाचक अटीबाबत
अनभिज्ञ आहेत. तसेच पिक विमा कंपनीची अधिकारी सुध्दा सर्वे करण्यास आला नाही. अश्या विचित्र परिस्थीत केवळ
शेतकऱ्यांना पिक विमा सवलतीपासून वंचित ठेवण्याचा पिक विमा कंपनी व शासनाचा तुघलकी डाव आहे. तरी
उस्मानाबाद जिल्हा हा सर्वात अधिक आत्महत्या ग्रस्त जिल्हा असल्याने व दुष्काळी असल्यामुळे शेती मालाला भाव
नाही. व अवेळी पावसामुळे नुकसान झाले. व ठरावीक शेतकन्यांनाच नुकसान भरपाई दिली त्यामुळे शेतकऱ्यांचे
नुकसान झाले आहे. व पिक विमा कंपनीच्या जाचक अटिमुळे अजुन आत्महत्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत
नाही. त्यामुळे सरसकट पिक विमा व नुकसान भरपाई देण्यात यावी. नसता शेतकरी संघटना या मुद्यावर जागोजाग रस्तारोको आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनापासून होणाऱ्या नुकसानीस पुर्णतः शासन जबाबदार राहील
या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मारवाडकर,चंद्रकांत भराटे,धनंजय जोशी,दादासाहेब चेडे,विलासराव देशमुख, वसंत कवडे,जगन्नाथ घुले आनंद कवडे,भास्करराव ,कवडे आदीच्या स्वाक्षरी आहेत
(छाया /राहुल कोरे आळणीकर)