काजळा येथे संत गाडगे महाराज यांचे जयंतीनिमित्त स्वछता अभियान

0
काजळा येथे संत गाडगे महाराज यांचे जयंतीनिमित्त स्वछता अभियान

उस्मानाबाद जिल्ह्यातील काजळा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.संत गाडगे महाराज यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारत गावातील युवकांनी,अबाल-वृद्धांनी हातात झाडू घेऊन संपुर्ण गाव स्वच्छ करीत गाडगे महाराजांना अभिवादन केले.गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नूतन सरपंच प्रविण पाटील व उपसरपंच जिजाबाई मडके यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते राजुळ पवार, नाना मडके,पोलीस पाटील सहदेव लांडगे उपस्थित होते.विकास राऊत बोलताना म्हणाले अज्ञान,अंधश्रद्धा,अनिष्ठ रूढी परंपरा यांच्यावर कडाडून हल्ला करणारे संत गाडगे महाराज म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठच होते.गोपला गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष करीत दिवसा गावे स्वच्छ करणारे व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करणारे गाडगे महाराज यांचे विचार व आदर्श सद्यस्थितीत दिपस्तंभाप्रमाणे आहेत असे मत विकास राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.सदर श्रमदानात विठ्ठल मित्र परिवार,रामानंद महाराज तरुण मंडळ व काजळा ग्रामस्थ यांनी उस्फूर्तपणे सहभाग  नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विकास राऊत यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top