पाचव्या दिवसी बेमुदत धरणे आंदोलन सुरुच,तर लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना,मनसे आदींचा पाठिंबा

0
पाचव्या दिवसी बेमुदत धरणे आंदोलन सुरुच,तर लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना,मनसे आदींचा पाठिंबा

तुळजापूर :-  दि.२१,तुळजापूर न.प.मुख्याधिकारी व त्यांचे सहकारी यांचेवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत ह्या व इतर मागण्या संदर्भात तुळजापूर तहसील कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून (दि.२१)रोजी पाचवा दिवस होता.
     आंदोलनाचे विषय वास्तव असून जबाबदार प्रशासन जाणीवपूर्वक आंदोलकांच्या अंताची वाट पाहात असल्याचे दिसते.मात्र गुन्हे नोंद करण्यास विलंब होईल तस तसे इतरही सामाजिक व राजकीय कार्य करणाऱ्या संघटना,पक्ष पदाधिकारी यांचे आंदोलनास पाठींबा मिळत आहे.
त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद सह राज्यामध्ये अन्यायाला वाचा फोडणारे मिलिंद रोकडे व त्यांचे सहकारी, रिपब्लिकन सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल भाऊ शिंगाडे,सुरज वाघमारे तसेच मनसेच्या वतीने डाँ.अफसर पठाण यांनी जाहीरपणे लेखी पाठिंबा  दिला असून यावेळी बालाजी गायकवाड, सारिकाताई कांबळे,सुरेश शिंदे,डाँ.मारुती क्षिरसागर, अमोल सगट,लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग कदम,बापू कसबे,लहुजी सिरसट आदी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रुपेश डोलारे , तुळजापूर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top