Osnanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, परंडा: वनिता विलास करळे, रा. नालगांव ता. परंडा या मुलगा, सुन यांना सोबत घेउन ऊस तोडणी कामगारांसमवेत 7 फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील ऊस कापणी करत होत्या. यावेळी त्यांचा दिर- अविनाश करळे हा मित्र- किरण पाटील यांनी तेथे येउन “मला 5-6 लाख रुपये द्या. नाहीतर ऊसात अर्धा हिस्सा द्या. त्याशिवाय मी तुम्हाला ऊस तोडू देणार नाही.” अशी धमकी वनिता यांना देउन ऊस तोडणी कामगारांना शिवीगाळ केल्याने कामगार ऊस तोडणी न करता परत निघून गेले. 9 फेब्रुवारी रोजी पुन्हा ऊस तोडणी सुरु झाली असता नमूद दोघांनी पुन्हा तेथे येउन पुन्हा अडवणूक व शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या वनिता करळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384, 341, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: देवचंद आदाप्पा जैन, रा. सास्तुर, ता. लोहारा हे 18 फेब्रुवारी रोजी 20.30 वा. राहत्या घरी होते. यावेळी गावकरी- शंभु माळी यांसह अन्य 4 पुरुषांनी देवचंद यांच्या घरात घुसून शेती संबंधीच्या जुन्या वादावरुन देवचंद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या देवचंद जैन यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेरुन भा.दं.सं. कलम- 452, 143, 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: कराळी, ता. उमरगा येथील अशोक निवृत्ती नागदे हे 19 फेब्रुवारी रोजी 12.00 वा. आपल्या शेतात गेले असता त्यांच्या शेत बांधावरील बाभळीचे झाड गावकरी- शंकर बिराप्पा दुधभाते याने बुंध्यापासून तोडले असल्याचे त्यांना दिसले. यावर अशोक नागदे यांनी त्याचा जाब विचारला असता शंकर दुधभाते यांनी त्यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन व दंडास चावा घेउन जखमी केले. अशा मजकुराच्या अशोक नागदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.