Osmanabad जिल्ह्यात 2 अल्पवयीन मुलींचे अपहरण - 2 girl - Kidnapping
उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील 17 वर्षीय दोन मुली (नाव- गाव गोपनीय) अनुक्रमे 19 फेब्रुवारी रोजी 19.00 वा. व 20 फेब्रुवारी रोजी 19.15 वा. घराबाहेर पडल्या होत्या. परंतु त्या मुली दुसऱ्या दिवशी पर्यत घरी परतल्या नाही. यावर त्यांच्या कुटूंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन त्या दोघींचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या दोन्ही मुलींच्या पालकांनी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.