Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हा दाखल

0



Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, तामलवाडी: शंकर माळी, रा. वडगांव (काटी), ता. तुळजापूर यांच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप 19- 20 फेब्रुवारी रोजीच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या शंकर माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, तुळजापूर: सखुबाई दयानंद वाघमारे, रा. मेंढा, ता. उस्मानाबाद या 17 फेब्रुवारी रोजी 17.10 वा. तुळजापूर बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना त्यांच्या कापडी पिशवीतील 24 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सखुबाई वाघमारे यांनी 20 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top