खासदार निलेश नारायण राणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा करण्याची शिवसेनेची ( ShivSena ) मागणी

0


खासदार निलेश नारायण राणे ( Nilesh Narayan Rane ) त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा करण्याची शिवसेनेची ( ShivSena ) मागणी

तुळजापूर (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग येथील माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी एका व्हिडीओ क्लिप द्वारे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी तुळजापूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले मागणीचे निवेदन नायब  तहसीलदार, श्री शिंदे साहेब पोलिस निरीक्षक श्री राठाडेसाहेब  यांच्यामार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवण्यात आले 


ग्रह मंत्री देशमुख यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की सिंधुदुर्ग येथील माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी 9 फेब्रुवारी 2021 रोजी एका व्हिडीओ क्लिप द्वारे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्याविरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक  विधान करून खासदार विनायक राऊत यांना मारहाण करणार असल्याची धमकी दिली आहे त्यामुळे शिवसेना सचिव खासदार राऊत यांच्या जीवितास कोणत्याही क्षणी घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग येथील माजी खासदार निलेश राणे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम तुळजापूर तालुका उपप्रमुख सुनील जाधव उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे युवा सेना शहर आधीकारी सागर इंगळे उपशहर प्रमुख दिनेश रसाळ अजय  साळुंखे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top