google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलांची कर्करोग तपासणी

जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलांची कर्करोग तपासणी

0
जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलांची कर्करोग तपासणी


उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) दि 8 - आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा स्त्रीरोग संघटना ,इंडियन मेडिकल असोसिएशन लेडीज विंग  यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना साठी गर्भाशय मुखाचा  व स्तनाचा कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते


          सोमवार दिनांक 18 मार्च 2021रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात  कर्करोग तपासणी शिबिरास प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ . धनंजय  पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद, डॉ. सचिन देशमुख इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हाध्यक्ष, डॉ. अनुराधा  गरड, जिल्हा स्त्रीरोग संघटना जिल्हाध्यक्ष, डॉ. स्मिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद ,डॉ. मीना जिंतूरकर, डॉ. आदिनाथ राजगुरू, डॉ. ललिता स्वामी ,डॉ. श्रद्धा मुळे, डॉ .टिके,  डॉ शैलजा मिटकरी, यांची उपस्थिती होती. 
या कार्यक्रमात डॉ धनंजय पाटील, डॉ अनुराधा गरड, डॉ सचिन देशमुख , डॉ स्मिता गवळी यांनी  उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. समाजामध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वत्रच  गर्भाशय मुखाचा व स्तनाचा कॅन्सर होण्याची संख्या वाढत आहे .यात प्रामुख्याने जास्त प्रसूती होणे, पांढरा पदर जाणे ,लाल पदर जाणे, रक्तस्त्राव होणे तसेच स्तनांमध्ये गाठ आढळून येणे ही प्रमुख कारणे आहेत .अशा प्रकारची लक्षणे दिसून आल्यास नियमितपणे शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी कॅन्सरचे निदान झाल्यास गर्भाशयाचा व स्थानाचा कॅन्सर आपण टाळू शकतो.
    आज जिल्हा स्त्री रुग्णालयात 100 महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासण्या 10 मार्च पर्यन्त स्त्री रुग्णालयात करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ स्मिता गवळी वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय यांनी केले आहे. 
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष पोतदार, तर आभार डॉ शैलजा मिटकरी यांनी केले. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सदरील कार्यक्रम यशस्वीते साठी स्त्री रुग्णालया तील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top