google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आरळी बु येथे विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान

आरळी बु येथे विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान

0

तुळजापूर - जागतिक महिला दिन विशेष अन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने  तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन दि.10 मार्च रोजी करण्यात आला. 

आरळी बु महोत्सव समिती व स्वामी नरेंद्रचार्य सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मागील 5 वर्षापासून जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार विशेष उपक्रम सुरू आहे.याच उपक्रमात यंदा नव्याने निवड झालेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, सरपंच गोविंद पारवे, ग्रा.पं. सदस्य संजय पाटील,भीमराव सोनवणे, चेअरमन अनिल जाधव, मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, क्रीडा प्रशिक्षक संजय नागरे, शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कोहिनूर सय्यद, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, संघटक संजय गायकवाड, समाजसेवक पंकज शहाणे, परमेश्वर आगलावे आदीं उपस्थित होते.

या नवदुर्गांचा झाला सन्मान 

श्रीमती सुषमा शंकरराव शहाणे (सामाजिक योगदान),शैलजा नरवडे  (सेंद्रिय शेती प्रयोग),सौ.जिनत कोहिनुर सय्यद (आदर्श सरपंच),डॉ.चंचला बोडके (आरोग्य कोरोना योद्धा),वर्षा रविंद्र कुदळे (लघु उद्योजिका),कोमल सतिष गोरे (पोलीस कोरोना योद्धा), मंजुषा कमलाकर स्वामी (उपक्रमशील आदर्श शिक्षिका),कु.प्रियंका किरण हंगरगेकर (सुवर्णकन्या),सौ.ज्योती पारवे (विशेष गौरव),पल्लवी श्रीकांत सोनवणे (विशेष सत्कार).


बातमी संकलन : -  रूपेश डोलारे तुळजापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top