Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): वडगांव (सि.) येथील गट क्र. 393 मधील शेतात 28.02.2021 रोजी 14.00 वा. वडगांव (सि.) येथील साधु भागवत जानराव व कुटूंबीय अशा 9 जणांचा Osmanabad येथील गणेश राजेंद्र मोरे व कुटूंबीय अशा 3 जणांशी शेती विषयक कारणावरुन वाद झाला. यावेळी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील स्त्री- पुरुषांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली..

यात साधु जानराव यांनी प्रथम खबर दिली की, गणेश राजेंद्र मोरे यांच्या गटाने  शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत भाऊजय- पल्लवी व वडील- भागवत अंबादास जानराव, वय 60 वर्षे हे मारहाणीत गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान भागवत जानराव हे 03 मार्च रोजी मयत झाले आहेत. यावरुन भा.दं.सं. कलम- 302, 323, 324, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तर गणेश राजेंद्र मोरे यांनी प्रथम खबर दिली की, जानराव गटाने गणेश मोरे व शिवाजी मोरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड-गोट्याने मारहाण करुन जखमी करुन दोघांच्या खिशातील 72,000 ₹ घेउन पळून गेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 143, 1247, 148, 149, 323, 327, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: संजय जगन्नाथ सुर्यवंशी, रा. चिवरी, ता. तुळजापूर हे 01 मार्च रोजी 12.30 वा. सु. गावातील बसवेश्वर गल्लीतुन स्कॉर्पीओ क्र. एम.एच. 13 व्हीएन 5191 ही चालवत जात असतांना रस्त्यावरील पाणी गावकरी- नागराज चंद्रकांत झिंगरे यांच्या अंगावर उडाल्याचा रागातून सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन व दगड डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या संजय सुर्यवंशी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, ढोकी: कोळेकरवाडी, ता. Osmanabad येथील गणेश व महेश कालीदास कोळेकर या दोघा बंधूंना 03 मार्च रोजी 20.30 वा. सु. गावकरी- विष्णु व भाऊसाहेब मुरलीधर एडके या दोघा बंधुंसह अन्य 6 व्यक्तींनी जुन्या वादाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी  विष्णु एडके यांनी खुनाची धमकी देउन गणेश यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या गणेश कोळेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 323, 143, 147, 148, 149, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top