Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी police ठाण्यात गुन्हे दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी police ठाण्यात गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, बेंबळी: चिखली, ता. उस्मानाबाद येथील प्रमोद हरिचंद्र महामुनी हे 02 मार्च रोजी 16.00 वा. सु. समुद्रवाणी येथील साप्ताहिक बाजारात असतांना त्यांच्या खिशातील स्मार्टफोन अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रमोद महामुनी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, आनंदनगर: उस्मानाबाद येथील अकबर चाँदखॉ पठाण हे 03 मार्च रोजी उस्मानाबाद बसस्थानकात उस्मानाबाद- लातुर बसमध्ये चढत असतांना त्यांच्या विजारीच्या खिशातील 29,000 ₹ रोख रक्कम अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन चोरुन नेली. अशा मजकुराच्या अकबर पठाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, तुळजापूर: पुणे येथील सुवर्णा बाबु माने या 03 मार्च रोजी 14.00 वा. सु. तुळजापूर येथील नवीन बसस्थानकात होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने सुवर्णा माने यांची पर्स धारदार पात्याने कापून पर्समधील 25 ग्रॅम सोन्याचे दागिने चारुन नेले. अशा मजकुराच्या सुवर्णा माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): श्रीराम व्यंकटराव देशमुख यांच्या जहागीरदावाडी गट क्र. 87 मधील खडी केंद्राच्या विद्युत रोहित्रातील तेल, तांब्याच्या तारेची वेटोळी (कॉईल) व अन्य साहित्य असा एकुण 3,40,000 ₹ चा माल अज्ञाताने 01- 02 मार्च रोजीच्या रात्री चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या देशमुख यांचे नातेवाईक- सुहास भगवानराव मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top