डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व रमजान महिना निमित्त टाकळी(बें)गावात रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद
कनगरा/प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व रमजान महिना , ईद सणानिमित्त बुधवार २८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २ वाजजे दरम्यान रक्तदान शिबीर झाले.या रक्तदान शिबीरात अनेक युवकांनी सहभाग नोंदवला होता.शिबीरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना आयोजक राजदीप जगताप यांच्या वतीने प्रेशर कुकर भेट देण्यात आला.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन विविध विकास कार्यकारी सोसायटी,टाकळी(बें) चे संचालक तानाजी गायकवाड यांनी केले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता सोनटक्के,राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे(ओबीसी सेल)तालुकाध्यक्ष प्रशांत सोनटक्के,राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे युवक सरचिटणीस शिवशांत काकडे,शिवगर्जना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिराम जाधव,पञकार अमोल गायकवाड,जि.प.शाळेचे मुख्याद्यापक माशाळकर सर आदिंची उपस्थिती होती.
रक्तदान शिबीराचे आयोजक राजदीप जगताप म्हणाले,कोरोना काळात गरजू रुग्णांना तत्परतेने रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना काळात रक्तदान करुन रक्तदात्यांनी कोरोना योध्दांची भूमिका पार पाडली आहे.तसेच आदम शेख म्हणाले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व रमजान ईदनिमित्त रक्तदान शिबीर राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सुरज पठाण,ईरफान पठाण,पिंटू वाघमारे,शरीफ पठाण,दादा शिखरे,प्रशांत कांबळे,किरण मोरे,सुनिल शिखरे,प्रेमराज वाघमारे आदिंनी परिश्रम घेतले.