उस्मानाबाद शहरात ( Osmanabad city ) विनाकारण बाहेर फिरणा-यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा - नगरसेवक युवराज नळे
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरात ( Osmanabad city ) विनाकारण बाहेर फिरणा-यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ( Osmanabad Collector Kaustubh Divegavkar ) यांच्या कडे युवराज नळे नगरसेवक , नगरपरिषद उस्मानाबाद यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कोविड -१९ ची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणावर रुग्न सापडत आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले आहेत, मात्र तरीही विनाकारण बाहेर फिरणा-यांची संख्या कमी होत नाही. म्हणून विनाकारण बाहेर फिरणा-यांची सक्तीने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून बाहेर फिरणा-यांवर काही अंशी पायबंद बसू शकेल.
तरी या संदर्भात लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती. युवराज नळे
नगरसेवक,नगरपरिषद उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-मेल द्वारे दिलेला निवेदनात नमूद केले आहे.


