google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad : बेंबळी पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंद्यांना ऊत पोलीसांचे माञ अक्षम्य दुर्लक्ष !

Osmanabad : बेंबळी पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंद्यांना ऊत पोलीसांचे माञ अक्षम्य दुर्लक्ष !

0

बेंबळी पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंद्यांना ऊत
पोलीसांचे माञ अक्षम्य दुर्लक्ष !

उस्मानाबाद/प्रतिनिधी
                        उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.पोलीस अधिकारी येतात,जातात परंतू अवैध धंदेवाल्यांवर माञ काहीच परिणाम होत नाही.कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमिवर सध्या राज्यासह जिल्ह्यात टाळेबंदी असल्याने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी झगडत असताना अवैद्य धंदेवाल्यांनी डोके वर काढून राजरोसपणे विनापरवाना मद्यविक्री,गांजाविक्री,मटका यासारखे अवैद्य धंद्यांची दुकाने चालवण्यास सुरुवात केली आहे. बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावातील चौकात व रस्त्याच्या कडेनी मोठ्या प्रमाणात मद्यविक्री विनापरवाना सुरु असून कोणाच्या आशीर्वादाने हे अवैद्य धंदे सुरु आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. त्यात नांदुर्गा,कनगरा,टाकळी,मेंढा,समुद्रवाणी,पाडोळी व स्थानिक बेंबळी पोलीस ठाण्याचे गावही दारुविक्रीसाठी हाॅटस्पाॅट असून पोलीस या अवैद्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यास अपयशी ठरत आहेत. या गावाकडे पोलीस फिरकायला तयार नसल्याने पोलीस आणि अवैद्य धंदेवाले यांच्यातच साटेलोटे असल्याच सर्वसामान्यांतून बोलल जात आहे.
          तसेच अवैद्य धंदेवाल्यांकडे पोलीस ठाण्यातून चुकून मोर्चा वळवलाच,तर याची खबर आधी अवैद्य धंदेवाल्यांना लागत असल्याने बेंबळी पोलीसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनातील अशा काही कर्मचार्‍यांमुळे प्रामाणिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नाहक प्रतिमा मलिन होत आहे. अवैद्य धंदेवाल्यांना कोणाचा आशीर्वाद आहे याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

      सध्या कोरोनासारख्या महाभयंकर माहामारीने राज्यासह जिल्ह्यातील अनेकांचा बळी घेतला आहे.राज्यात टाळेबंदीची घोषणा सरकारने केली असली,तरी मद्यविक्री,मटका,गांजा सारख्या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत असून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरच निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी  जिल्ह्यातील आणेक गावात अवैद्य धंदे चा ' नामो निशान ' मिटवला आहे . उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने देखील उत्तम कामगिरी करत आहेत . मात्र काही मोजक्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होते आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top