google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके व शिवसेना नेते अजित लाकाळ यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन केले बिसलरी बॉक्सचे वाटप

शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके व शिवसेना नेते अजित लाकाळ यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन केले बिसलरी बॉक्सचे वाटप

0

शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके व शिवसेना नेते अजित लाकाळ यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन केले बिसलरी बॉक्सचे वाटप


उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्ण संख्या देखील झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालय अपुरी पडू लागली आहेत. त्यामुळे आ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी बार्शी येथे जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात १ हजार रुग्ण क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरला शिवसेनेचे उस्मानाबाद शहर उपप्रमुख प्रशांत साळुंके व शिवसेना नेते अजित लाकाळ यांनी दि.१६ मे रोजी भेट दिली. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 


यावेळी या रुग्णांसाठी मदत म्हणून साळुंके यांनी १० बिसलरी पाण्याचे बॉक्स भेट दिले आहेत. साळुंके यांचे सामाजिक कार्य सतत सुरू असून त्यांनी उस्मानाबाद शहरात देखील वाफ घेण्याचे मशीन मास्क शनि टायझर आधी साहित्याचे वाटप केलेले आहे. तर बार्शी येथील कोविड केअर सेंटरला मदत करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. यावेळी केंद्र समन्वयक विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, ॲड. विवेक पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top