अन्यथा शेतकऱ्याचे संपूर्ण कुटंबच आत्महत्या करणार ! जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील कर्जबाजारी शेतकरी बब्रुवान निकम यांच्या शेतातील वीज कनेक्शन वेळेवर बिल भरले असतानाही दोन महिन्यापूर्वी कट केलेले, जोडण्यात यावे अन्यथा संपूर्ण कुटंबच आत्महत्या करणार  या संदर्भात ऊर्जा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महावितरण, तहसीलदार यांना निवेदन,

दि, 24 मे 2021 रोजी, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात शेतकऱ्यांनी असे नमूद करण्यात आले आहे की, बब्रुवान हरिबा निकम रा, पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील रहवाशी असून याच गावामधील  गट क्रमांक 135 मध्ये त्यांची 5 एकर जमीन आहे, याच जमिनीत एक विहीर, असून मी अंदाजे पाच ते सहा वर्षांपूर्वी डिमांड भरलेले असून, मागील दोन महिन्यापासून माझी शेतातील वीज कट करण्यात आले आहे, आजपर्यंत लाईट बिल प्रत्येक वेळी वेळेवर भरलेली असतानाही तसेच खूप वेळा महावितरणचे अधिकारी श्री कावरे व कर्मचारी, श्री गोरे  यांना भेटून वीज जोडणी बाबत वेळोवेळी विनंती केल्यापासून त्यांनी माझी दोन महिन्यापासून दखल घेतली नाही, माझ्या शेतातील भुईमूग, पाळीव जनावरांसाठी वैरण लावलेले असून पाण्याअभावी सदरील पिके वाळून चालली आहेत, मला सध्या काहीही कामधंदा नाही, व लॉकडॉन मुळे  बँकेतून पीक कर्ज घेतलेले असून सदरील पीक कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे कोणतेही साधन नाही, व संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, मला व माझ्या कुटुंबाला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही, जर माझ्या शेतातील कनेक्शन ३१ मे २०२१  पर्यंत नाही जोडली,तर मी व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य ०१ जून  २०२१ रोजी स्वतःच्या शेतात आत्महत्या करून जीवन यात्रा संपून टाकणार आहोत, याची संपूर्ण जबाबदारी महावितरण व प्रशासनाची असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर शेतकरी बब्रुवान हरिबा निकम यांची स्वाक्षरी आहे,

 बातमी संकलन :-  रुपेश डोलारे तुळजापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top