Osmababad जिल्ह्यातील लोहारा शहरात 300 कुटूंबाना वाफ घेण्यासाठी मशीन वाटप
मे ०२, २०२१
0
लोहारा :- शहरात गेल्या वर्षी कोरोणा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील प्रत्येक घरामध्ये शिव मित्र मंडळाच्या माध्यमातून युवासेना तालुकाप्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांनी अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप केले. तसेच शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालय, बॅका व नाभिक व्यवसायीकांस फेसशिल्ड व सॅनिटायझरचे वाटप केले होते. तसेच शहरातील संपुर्ण बाजारपेठेत सॅनिटायजरचे वाटप केले होते. त्यातच यावर्षी फेब्रुवारी, मार्च मध्ये शहरामध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पायबंद घालण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखावा यासाठी शिव मित्र मंडळच्या माध्यमातुन युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या सौजन्याने शहरातील शिवनगर, प्रभाग क्र ६ मधील ३०० कुटूंबाना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तिगृहातील कोविड केअर सेंटर मध्ये वेपोराइझर (वाफ घेण्याची मशिन) चे वाटप करण्यात आले आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा