google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad व अहमदनगर जिल्ह्यांतून चोरलेल्या 3 वाहनांसह 3 आरोपी अटकेत.

Osmanabad व अहमदनगर जिल्ह्यांतून चोरलेल्या 3 वाहनांसह 3 आरोपी अटकेत.

0



उस्मानाबाद (Osmanabad ) व अहमदनगर जिल्ह्यांतून चोरलेल्या 3 वाहनांसह 3 आरोपी अटकेत.

उस्मानाबाद :-स्थानिक गुन्हे शाखा: स्प्लेंडर मोटारसायकल चोरी संबंधी तुळजापूर पो.ठा. येथील गु.र.क्र. 151 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 नुसार च्या तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, धनंजय कवडे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, संबंधीत चोरीतील स्प्लेंडर मोटारसायकल ही जिजामाता नगर, तुळजापूर येथील अभिजीत नागनाथ शिंदे, वय 20 वर्षे हा वापरत आहे. यावरुन पथकाने दि. 08 मे रोजी त्यास संबंधीत मोटारसायकलसह ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

            दुसऱ्या घटनेत लोहारा पो.ठा. येथील गु.र.क्र. 80 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या महिंद्रा अर्जुन अल्ट्रा शेती ट्रॅक्टरचा स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोहेकॉ- धनंजय कवडे, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड यांचे पथक शोध घेत होते. तपासादरम्यान लोहारा (खु.) येथील रहिवासी 1)हनुमंत भरत रसाळ, वय 26 वर्षे 2)आकाश किसन कांबळे या दोघांना नमूद चोरीच्या ट्रॅक्टर व चोरी करण्यासाठी वापरलेल्या स्प्लेंडर मो.सा. सह आज दि. 09 मे रोजी लोहारा येथून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या अन्य एका रॉयल ईनफील्ड बुलेट मोटारसायकलच्या ताबा- मालकी विषयी विषयी त्यांना विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही. यावर पथकाने मो.सा. चा सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या सहायाने तांत्रीक तपास केला असता ती मोटारसायकल अहमदनगर जिल्ह्यातून चोरीस गेल्यावरुन संगमनेर पो.ठा. गु.र.क्र. 73 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने त्या दोघांना नमूद दोन्‍ही चोरीतील ट्रॅक्टर व बुलेट मो.सा. सह ताब्यात घेउन लोहारा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच अहमदनगर पोलीसांना संबंधीत चोरीच्या मोटारसायकल जप्ती बाबत कळवण्यात आले असुन त्या विषयी उर्वरीत तपास अहमदनगर पोलीस करणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top