उस्मानाबाद जिल्ह्यात २७ मे ते २९ या काळात वादळी वारे वाहण्याची , विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता ! जिल्हा प्रशासनाकडून सुचना जारी - Osmanabad district 27 may to 29 may Guidelines

0

उस्मानाबाद जिल्ह्यात २७ मे ते २९ या काळात वादळी वारे वाहण्याची , विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता ! जिल्हा प्रशासनाकडून सुचना जारी 

उस्मानाबाद  :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र , मुंबई यांनी दिनांक २५ मे २०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार दिनांक २७ मे २०२१ ते २९ मे २०२१ या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची , विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे . खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी .अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 या गोष्टी करा :
 १ ) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा , जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा . 
२ ) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंया सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या . घराच्या बाल्कनी , छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका ,
 ३ ) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा . 
४ ) तारांचे कुंपण , विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा . 
५ ) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा . 

या गोष्टी करू नका 

: १ ) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लैंडलाईन फोनचा वापर करू नका . शॉवरखाली अंघोळ करू नका . घरातील बेसिनचे नळ , पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये .
 २ ) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये ,
 ३ ) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नये .
 ४ ) धातूंच्या उंच मनोयाजवळ उभे राहु नये ,
 ५ ) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथया खिडकीतून वीज पडताना पाहू नये . हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे . 

अशी माहिती प्रेस नोट द्वारे
शिवकुमार स्वामी , निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , उस्मानाबाद यांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top