लोहारा तालुक्यातील 21 गावांत 10 दिवसाचा जनता कर्फ्यु -- उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले - SDM LOHARA

0

लोहारा तालुक्यातील 21 गावांत 10 दिवसाचा जनता कर्फ्यु -- उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले

( इकबाल मुल्ला )

लोहारा तालुक्यातील 21 गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी 12 जूनपर्यत या गावात जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत. लोहारा शहरासह तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आतापर्यत तीन हजाराच्या पुढे रग्ण सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे.
 तर 400 वर आजही अँक्टिव्ह आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी काही प्रमाणात रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. पण पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. 
याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी तालुक्यातील 21 गावांमध्ये 10 दिवसाचे जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 2 ते 12 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई हुकूम आदेश लागू केला आहे. या आदेशाप्रमाणे 21 गावातील सर्व दुकाने पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील. तथापी रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न मेडिकल चालू राहतील. तसेच या गावातील नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदरील अत्यावश्यक सेवा पुरवताना सोशल डिस्टनसिंग व आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
या 21 गावांमध्ये 10 दिवसाचा जनता कर्फ्यु लागू
लोहारा, कानेगाव, नागुर, लोहारा खुर्द, जेवळी, एकोंडी लो, धानुरी, हिप्परगा (रवा), सास्तुर,खेड, आष्टाकासार, मार्डी, कास्ती बु., अचलेर, भातागळी, मोघा बु, सालेगाव, कोंडजीगड, नागराळ, तावशीगड, वडगाव (गां), जेवळी दक्षिण हे गावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top