देशातील पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या डॉक्टर वर कारवाईसाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन

0

देशातील पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या डॉक्टर वर कारवाईसाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन


वाशी : - तालुक्यातील एका खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणा-या डाॅक्टरने देशातील पञकाराविषयी अपशब्द वापरून पत्रकारांना अपमानीत केल्याबद्दल त्याचा वाशी तालुक्यातील पत्रकारांनी निषेध करून त्याचेवर तात्काळ कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन वाशीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांचेकडे सादर केले आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास वाशी तालुक्यातील सर्व पत्रकार वाशी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशी येथील वैद्यकीय खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर नितीन भराटे यांनी दि.9जून रोजी  सकाळी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून संपूर्ण भारत देशातील पत्रकारांना जोड्याने हाणले पाहिजे त्याशिवाय भारत देश सुखी होणार नाही. अशा शब्दात अपमानित केले आहे. अशा डॉक्टरी पेशेला काळीमा फासणाऱ्या डॉक्टर वर कडक कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन वाशी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी दिले आहे.निवेदनावर मुकुंद चेडे, गौतम चेडे, दादासाहेब लगाडे, नेताजी नलावडे, शोएब काझी, विकास माळी, राहुल शेळके, अजय वीर,कृष्णा शिंगणे, बंडू मुळे, दत्तात्रय भराटे तसेंच तालुक्यातील आदी पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top