राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा कार्यालय येथे ध्वजारोहण - Osmanabad NCP

0
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय येथे जीवनराव गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच 
वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  मध्यवर्ती बस स्थानक परिसर व जिजाऊ नगर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिन हा पुढील दहा दिवस आरोग्य दिंडी म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष मा.सुरेश दाजी बिराजदार यांनी केली. या आरोग्य दिंडी अंतर्गत पक्षाच्यावतीने...

१)कोरोना व म्युकरमायकोसिस आजार विषयक माहिती, या आजाराच्या रुग्णांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या जनहितार्थ योजना तसेच मास्क-सॅनिटायझर यांच्या वापराचे महत्त्व, यासंदर्भात जनजागृती करणे,

 २)कोरोना रोगाचे बदलते स्वरूप, त्या अनुषंगाने घ्यावयाची लहान मुलांची काळजी, याबाबत तज्ञ डॉक्टर्स यांच्या मदतीने जनतेसाठी थेट संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहे

    ३)  कोरोना लसीकरण मोहिमेस 100% यशस्वी करण्याच्या अनुषंगाने लसीकरणा विषयक असलेले समाजामधील गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करून लोकांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची व्यवस्था करणे.

    ४)नवीन लसीकरण केंद्र व सध्याच्या अस्तित्वात असलेले लसीकरण केंद्र व रक्तपेढीची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पक्षाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

     ५) ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे लसीकरण करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविणे.

      ६) पोस्ट कोविड  कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी जनजागृती करणे

      ७)कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांची माहिती संकलित करून  त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

       ८) पावसाळ्यात उद्भवणारे आजार, साथीचे रोग या पासून घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत जनजागृती करणे 

       तसेच ९) शासनाच्या विविध आरोग्य योजना या संदर्भात माहिती लोकांपर्यंत पोचवणे असे विविध उपक्रम आरोग्य दिंडी दरम्यान आयोजित केले जाणार असल्याबाबत ची माहिती जिल्हाध्यक्ष मा.सुरेश बिराजदार यांनी दिली.
              
              प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जि.प सदस्य महेंद्र दुरगुडे, माजी नगराध्यक्ष संपत आबा डोके, माजी जि.प. उपाध्यक्ष संजय दुधगावकर, विधानसभा अध्यक्ष अमित  शिंदे, प्रतापसिंह पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा माडजे मगर, प्रदेश सचिव  मसूद भाई शेख,युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे,न.प. गटनेते गणेश बापा खोचरे,नगरसेवक प्रदीप घोणे ,बाबा मुजावर ,खलिफा कुरेशी ,इस्माईल शेख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, संस्कृतीक सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खालील पठाण, अमोल सुरवसे,नंदकुमार गवारे, कादर खान,  तुरुप सर,गौस  तांबोळी ,रणबीर इंगळे, लतीफ पटेल, युवा नेते मृत्युंजय बनसोडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, मीनील काकडे, विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ प्रदिवराव देशमुख ,एस के इनामदार ,उस्मानाबाद युवक तालुकाध्यक्ष अमरसिंह देशमुख,अभि इंगळे उपाध्यक्ष , सागर चव्हाण, सुगत सोनवणे, राजाभाऊ ओव्हाळ,महेश सुरवसे, पुथ्वीराज मुळे इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top