कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात मस्कचे वाटप

0
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात मस्कचे वाटप

लोहारा  /  प्रतिनिधी

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतात जाऊन भाजीपाला पिकवायचा तो बाजारात आणून विकायचा हे महत्त्वाचं कार्य करणारा जगाचा पोशिंदा माझा बळीराजा, स्वतः मात्र मास्क खरेदी न करता रुमाल,पंचा तोंडाला गुंडाळलेला दिसतो.ज्यामुळे त्याच्या जीवाला तर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे याच सामाजिक भान ठेवून एक सामाजिक कर्तव्य म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा रंजनाताई श्रीकांत हासुरे यांच्या वाढदिवसानिमित्त व अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त लोहारा शहरात येऊन भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जिजाऊ ब्रिगेड तर्फे N95 मस्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे तालुकाकार्याध्यक्षा प्रतिभाताई परसे,पत्रकार कालिदासभाऊ गोरे,संत मारुती महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी मेनकुदळे सर, सामाजिक कार्यकर्ते मिलिंदकाका,संभाजी ब्रिगेड हराळी चे अभिजित सुर्यवंशी, आदि उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top