कळंब - श्री संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम येथे दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षाची पूजा करून संवर्धनाची शपथ घेण्यात आली. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. ऑक्सिजनचे महत्त्व आणि त्यासाठी मोफत प्राणवायू देणारे वृक्ष किती आवश्यक आहे यावर ह-भ-प महादेव महाराज आडसुळ,सुरेश टेकाळे, सुभाष घोडके शिवाजी गिड्डे,बंडू ताटे यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या सुरवातीस स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे व सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना माधवसिंग राजपूत यांनी केले तर आभार सरस्वती आडसूळ यांनी मानले