लोहारा / प्रतिनिधी
निसर्गाचा हास थांबवण्यासाठी वृक्षारोपण करणे विशेषत वृक्षाला जपने ही काळाची गरज बनली असून वटपौर्णिमा सणाची संस्कृती जपत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निसर्ग सवर्धनासाठी एक प्रकारचा वेगळा संदेश देत लोहारा शहरातील तहसिलच्या परिसरात व ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वडाच्या झाडाचे वृक्षारोपण विधवा,निराधार महिलांच्या हस्ते करून एक अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली या दिनी सर्व निसर्ग प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हे वृक्ष लागवड करावे व निसर्ग पूजेचा संदेश समाजासमोर ठेवावा असे आव्हान लोहारा तहसिलचे तहसीलदार श्री संतोष रुईकर यांनी सांगितले यावेळी, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे, उपाध्यक्ष गोकर्णा कदम,कार्याध्यक्ष प्रतिभा परसे,सुवर्णा कुंभार, सुमन कोळी न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल संचालिका सविता जाधव ,महेश श्रीरसागर,वजीर मणियार, डॉ बळी मेडम, खंडू शिंदे, आदी तहसील,आरोग्य कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते,