कोरोना काळात तुरोरी मधील खरे देवदूत डॉ. विजयकुमार शिंदे..

0

कोरोना काळात तुरोरी मधील खरे देवदूत डॉ. विजयकुमार शिंदे..

उमरगा ( महादेव पाटील)
तालुक्यातील तुरोरी गावात करोना काळात कोणतेही कारण न देता सातत्याने कार्यरत असलेले डॉ. विजयकुमार शिंदे. लोकांना औषधे देण्यासोबतच धीर देण्याचे आणि बळ देण्याचे काम त्यांनी केले. करोनाशी लढताना मानसिक आधारही महत्त्वाचा होता हे जाणून डॉ. विजयकुमार शिंदे आपल्या वैद्यकीय पेशाचा वसा निभावत आहेत.
  गेली २७ वर्षे तुरोरीमध्ये कार्यरत आहेत. या आधी डेंग्यू, चिकुन गुनियाच्या साथीशीही त्यांनी मुकाबला केला आहे. मात्र हा साथीचा आजार काही वेगळाच होता. डेंग्यू, चिकुन गुनियामध्ये काय होऊ शकते हे माहीत होते. मात्र करोनावर उपचार करताना रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हायला सांगूनही ते दाखल होत नव्हते. तेव्हा डॉक्टरांनाच रुग्णांचे समुपदेशन, विनंती करावी लागते.
  करोना काळामध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स दवाखाना सुरू ठेवायचा की नाही या संभ्रमात असताना त्यांनी एकही दिवस सुटी न घेता काम केले आहे. सकाळी नऊ वाजता उघडलेला दवाखाना बंद करायला त्यांना रात्रीचे अगदी दोनही वाजले आहेत. करोनाच्या आधी जशी सखोल तपासणी केली जायची तशीच रुग्णांची तपासणी सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले. दवाखाना बंद ठेवला असता तर येथील रुग्णांना उमरग्याला जायला लागले असते. उमरगा शहारत करोनाबाधित रुग्णही येत होते. त्यामुळे या परिसरामध्ये करोना संसर्ग होण्याचा धोका होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी दवाखाना सुरूच ठेवला.
  कोविडच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधित रुग्ण दवाखान्यात आल्याने डॉ . शिंदे स्वतः पॉझिटिव्ह आले होते . त्यामुळे आठवडाभरासाठी क्लिनिक बंद केले होते . तसेच स्वतः क्वॉरंटाइन असूनही रुग्ण व नातेवाइकांना मोबाइलद्वारे मार्गदर्शन आणि औषधे देऊन आजारमुक्त केल्याची शेकडो उदाहरणे आहेत . अशावेळी डॉ विजयकुमार शिंदे यांनी सेवा नियमित ठेवून रुग्णांना सेवा देण्याचे कार्य अविरत पार पाडले . तुरोरी येथील डॉ . विजयकुमार शिंदे व त्यांचा १५ स्टाफ च्या सोबतीने  ग्रामीण भागातील रुग्णसेवेत मोलाचे योगदान दिले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top