श्रीगिरे हॉस्पिटलच्या वतीने डॉ सचिन शेंडगे यांचा सत्कार

0

 लोहारा  / प्रतिनिधी

लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल च्यावतीने आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ भावनेतून आपल्या जीवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उमरगा येथील डॉ.सचिन शेडगे MD,(med) डॉ.के ड़ी शेंडगे हॉस्पिटल, उमरगा यांचा श्रीगिरे हॉस्पिटल येथे मान्यवरांकडून 'कोरोना योदधा' म्हणुन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी डॉ हेमंत श्रीगिरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,फेटा, देऊन डॉ सचिन शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी डॉ सौ रुपाली श्रीगिरे,माजी उपसरपंच व्यंकट घोडके,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,मा.पंस सदस्य सुधीर घोडके,मा नगरसेवक आयुब शेख,उत्तमराव पाटील,श्री बसय्या स्वामी सर,पत्रकार यशवंत भुसारे श्री आलुरे,न्यु व्हिजन स्कुल मुख्याध्यापक शहाजी जाधव,दशरथ श्रीगिरे,रघुवीर घोडके,गणेश खबोले सर्व हॉस्पिटल मधील कर्मचारी आदि उपस्थित होते.
      डॉ सचिन शेंडगे यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर उमरगा येथे स्वतःच्या खाजगी कोविङ हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ३४० कोरोना बाधित रुग्णांचे यशस्वी उपचार केले आहेत. त्यात ३५ ते ४० कोरोना बाधित रुग्णांवर महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार केले आहेत.तसेच कर्नाटक,तेलंगणा राज्यातील अनेक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले आहे.उमरगा, लोहारा तालुक्यातील अनेक रुग्णांना डॉ. सचिन शेंडगे यांच्यामुळे वेळेत व महात्मा फुले योजनेतून मोफत कोरोना उपचार मिळाल्यामुळे मोठा आधार मिळाला.सर्व जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top