उस्मानाबाद : शेतात निर्मनुष्य असनारे घर, पत्रा शेड यातील धान्य चोरीस जाण्याचे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांत जिल्हाभरात घडले होते. या धान्य चोरीचा छडा लावण्यासाठी स्था.गु.शा. चे पथक मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोऱ्यांची कार्यशैली अभ्यासून आरोपींचा शोध घेत होते.
या मोहिमे दरम्यान पोनि- श्री. गजानन घाडगे, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, ठाकुर, शेळके, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अशोक ढगारे, बबन जाधवर, सर्जे, अविनाश मारलापल्ले, आरसेवाड, माने यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ढोकी व मोहा येथील पारधी पिढीवर राहणाऱ्या काही पुरुषांचा या चोरीत सहभाग असु शकतो. यावर पथकाने गोपनीय तपास करुन या खबरेची सत्यता पडताळुन काल रविवार दि. 13 जून रोजी पहाटे 03.00 ते 06.00 दरम्यान ढोकी, तेर, पळसप गाव शिवारात छापे टाकले. या छाप्यांत 1)दादा उध्दव चव्हाण 2)अनिल उध्दव चव्हाण 3)विकास उध्दव चव्हाण 4)युवराज राजाराम काळे 5)महादेव सुरेश चव्हाण, सर्व रा. राजेशनगर पारधी पिढी, ढोकी 6)आबा आप्पा शिंदे, रा. पारधी पिढी, मोहा 7)अंकुश कल्याण शिंदे, रा. ईटकुर, ता. कळंब यांसह नमूद चोरीतील धान्य खरेदी करणारे 8)वैभव आप्पासाहेब आष्टीकर 9)सुधाकर माणिक जाधव, दोघे रा. तेर यांस अटक करण्यात आले. शेत, घरातील धान्य चोरी संबंधी उस्मानाबाद (श.)-1, उस्मानाबाद (ग्रा.)-2, ढोकी- 2, वाशी- 2, कळंब- 1, येरमाळा- 1 पो.ठा. अशा एकुण 9 गुन्ह्यांत या आरोपींचा सहभाग असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने नमूद आरोपींच्या ताब्यातून प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. वजनाची हरभरा- 75, सोयाबीन- 47, राजमा- 39, ज्वारी- 8 पोती व किराणा सामान अशा साहित्यासह चोरी करण्यास वापरलेले एक पिकअप वाहन जप्त करण्यात आले. या आरोपींचा अन्य काही गुन्ह्यांत सहभाग असल्याचा संशय असून उर्वरीत तपास संबंधीत पोलीस ठाण्यामार्फत केला जाणार आहे.
या दमदार कामगीरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी स्था.गु.शा. च्या पथकाचे अभिनंदन केले आहे.