तेरणा महाविद्यालयात 'वाचन दिन' साजरा

0

उस्मानाबाद :- तेरणा महाविद्यालय येथे स्वर्गीय पी.एन.पाणीकर यांच्या स्मरणार्थ 'वाचन दिन' साजरा करण्यात आला . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक घोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रम प्रसंगी झोंबी - आनंद यादव ,कोसला- भालचंद्र नेमाडे यांच्या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ.रशीद सय्यद,डॉ.जी.जी.हिडगे,डॉ.सुशीलकुमार सरवदे,प्रा.सुधाकर चव्हाण,डॉ.तुळशीराम उकिरडे,आम्रपाली चंदनशिवे(संशोधक विद्यार्थीनी),बी.बी.पाटील,भास्कर जाधव,राजकुमार जगदाळे,लक्ष्मण शिंदे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी तर आभार डॉ.जी.जी.हिडगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top