युवा नेते स्वप्निल भैय्या शिंगाडे व सेवानिवृत्त रमेश कांबळे यांचा पाणी दान केल्याबद्दल सत्कार...
उस्मानाबाद :- रुग्ण कल्याण समितीच्या पाणी दान उपक्रमात सहभागी होऊन शासकीय रुग्णालयात सेवानिवृत्त रमेश लिंबराज कांबळे यांनी तर महिला रुग्णालयात सातत्याने पाणी दान करित असलेले युवा नेते स्वप्निल भैय्या शिंगाडे यांनी पाणी दान केले, मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.शासकिय रुग्णालयात सातत्याने उमेश राजे निंबाळकर यांच्या कडुन पाणी दान केले जात आहे, पाणी दाते यांचे आभार रुग्ण कल्याण समितीच्या वतीने करण्यात आले तर युवा नेते स्वप्निल भैय्या शिंगाडे यांनी सत्कार केल्या बद्दल धन्यवाद मानले, यात प्रामुख्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव जगताप, डॉ.विरभद्र कोटालवार,डॉ.मुकेश राव, परिचारिका संध्याताई निकम,प्रेमाताई निंबाळकर मॅडम, रौफ शेख,विलास लोंढे, नासेर शेख,रुग्ण कल्याण समिती सदस्य लतिफ मजीद, गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने, सचीन चौधरी,रमेश गंगावणे, विजय सपकाळ, राजाभाऊ सरवदे, अन्य इतर उपस्थित होते..