महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या युवक जिल्हा अध्यक्ष पदी इम्तियाज बागवान यांची निवड.

0
      उस्मानाबाद :- महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद युवक जिल्हा अध्यक्ष  पदी इम्तियाज बागवान यांची निवड व तसेच उस्मानाबाद युवक शहर अध्यक्ष पदी तोफिक काझी यांची निवड मा. नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या हस्ते करण्यात आली. 

     उस्मानाबाद येथिल समाजसेवक इम्तियाज बागवान यांनी कोरोना महामारी मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्ल व तसेच नेहमी सामाजिक कार्यामध्ये  अग्रेसर असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची व सामाजिक जन जागृतीची  संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ति करण्यात आली. 
    तसेच भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने त्याना सांगण्यात आले. व तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. 
      यावेळी आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, , रईस मुजावर महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष, मुर्तजा सय्यद तालुका अध्यक्ष, इरफान सौदागर शहर अध्यक्ष, तय्यब मुजावर,मुबीन मुजावर, सोहेल कुरेशी, तय्यब अन्सारी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top