उस्मानाबाद :- तालुक्यात 9 जुलै रोजी झालेल्या जोरदार ढगफुटी पावसा मध्ये पूर आल्याने वाहून जाणाऱ्या 4 पैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले होते मात्र दोघे वाहून गेलेला दोघांना शोधण्याचे काम सुरू होते मात्र दोघांपैकी एक बोरखेडा, बोरगाव राजे बोरखेड रस्त्यावरील पुलावरून जाताना समीर युनुस शेख ( वय 27 ) वर्ष हे वाहून गेले होते .
आज सकाळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कनगरा जवळ याठिकाणी पाण्यात एक मृत्य देह आढळला आहे तो समीर शेख यांचा असल्याची माहिती खात्री करणे सुरु आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी सकाळी 07: 44 वाजता तहसीलदार गणेश माळी यांना फोन केला मात्र तहसीलदार यांनी फोन 'रिसीव'न केल्याने , दोन जण वाहून गेलेल्या पैकी एकाची प्राथमिक वरील प्रमाणे माहिती आहे. याठिकाणी तरंगताना मृतदेह सापडल्याने ग्रामस्थ नागरिकातून हळहळ व्यक्त होत आहे.
समुद्रवाणी येथून पूर आणि साठी गेलेला एक व्यक्ती वाहून गेला आहे अशी माहिती तहसीलदार यांनी दिली होती त्या व्यक्तीचा अजून शोध लागलेला नाही.
जिल्हा प्रशासन याबाबत काय पावले उचलणार ? हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज घेऊन यापुढे नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय पावले उचलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.