पेट्रोल, डिझेल व घरगूती गॅस महागाई विरोधात काँग्रेसचे "सायकल यात्रा" काढून आंदोलन..

0

उस्मानाबाद :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या जीवघेण्या महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या महागाई विरोधात उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज उस्मानाबाद येथे "सायकल यात्रा" काढून निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, जिल्हा सचिव सुरेंद्र पाटील, बेंबळीचे उपसरपंच सत्तार शेख, अमर माने, असंघटित कामगार अध्यक्ष देवानंद येडके, सेवा दलाचे अध्यक्ष प्रणित डिकले, विधी विभागाचे विश्वजित शिंदे, अतुल देशमुख, किसान काँग्रेसचे गौरीशंकर मुळे, युवकचे प्रदेश प्रवक्ते कृष्णा तवले, सलमान शेख, संजय गजधने, किशोर राऊत, कफिल सय्यद, नियामत मोमीन, विद्यार्थी काँग्रेसचे सौरव गायकवाड, समाधान घाटशिळे, सचिन धाकतोडे, सुधीर अलकुंटे, प्रेम सपकाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी "मोदी सरकारचा धिक्कार असो.." "जनतेची लूट थांबलीच पाहिजे.."
"पेट्रोल, डिझेल, गॅस ची दरवाढ रद्द करा.." 
 अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी उपस्थितानी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top