शम्सुल उलुम उर्दु हायस्कुलचे शालान्त प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल शंभर टक्के

0
उस्मानाबाद : शहरातील खाजा नगर येथील शम्सुल उलुम उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा शालान्त प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विदयालयातुन एकूण 121 विदयार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी विशेष प्राविण्यासह 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 12 विदयार्थी ठरले आहेत. 42 विदयार्थी विशेष प्राविण्य प्रथम श्रेणीत 58 विदयार्थी, व इतर 21 विदयार्थी द्वितिय श्रेणीत यश संपादन केले आहे. प्रशालेतुन कादरी जव्हेरिया 97.20 प्रथम सयद अनम असफिया 97 टक्के घेवून द्वितिय आली आहे.

तसेच शेख शिफा नईम 94.40, मोमीन जोहा फातेमा 94.40, सयद राफिया94, शेख सादिया 93. 40, मोमीन अरिबा 92.80, पठाण तहुरा 91.80, पठाण शाफिया 91.20, काजी महेविश 91.20, शेख फातेमा 90.60, काजी सफुरा 89.80, कोबू आयेशा 89.40, काजी सबा 89 विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशस्वी विदयार्थीनींचे संस्था अध्यक्ष श्री शेख लईख अहमद, सचिव शेख लईख सरकार व मुजीब साहेब, डॉ. तब्बस्सुम सुलताना तसेच मुख्याध्यापिका काजी रेशमा परविन, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यानी अभिनंदन केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top