आँल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हास्तरीय बैठक संपन्न

0
आँल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हास्तरीय बैठक संपन्न

उस्मानाबाद :-  शहरातील मौलाना अबुल कलाम आजा़द शाळेमध्ये आँल ईंडीया ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. आँल ईंडीया ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 जुलै रोजी बैठक संपन्न झाली. बैठकीत सुप्रिम कोर्टाने रद्द केलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा करण्यात आली या बैठकीला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी आँल ईंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या
 उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी मौलाना हाफीज़ अलीमोद्दिन , युवा जिल्हाध्यक्ष ईम्तियाज़ बागबान यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमास नगरसेवक बाबा मुजावर , माजी नगर सेवक मैनुधीन पठाण,  योजय शिंगाडे , दैनिक संघर्षचे संपादक संतोष हंबीरे , गयाजोद्दीन मुजावर , अॅड .उस्मान मारवे , अय्युब शेख , इफतेखार पटेल व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top