उस्मानाबाद - तेरखेडा परिसरात भीषण अपघात
तिरुपतीला दर्शनासाठी निघालेले चार जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी
सोलापूर औरंगाबाद महामार्गावर तेरखेडा गावच्या परिसरात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरला व आयसरच्या झालेल्या या धडकेत तिरुपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा टेम्पो ट्रॅव्हलर पपंचर झाल्याने तेरखेडा येथील माऊली हॉटेल जवळ थांबला होता. यावेळी याच मार्गाने उस्मानाबादकडे जात असलेल्या आयसरने या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिलीय. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व गावातील नागरिक याठिकाणी हजर झाले. जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद येथे हलविण्यात आले आहे.
विडियो बातमी ...