osmanabad जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 17 कारवाया

0



उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 17 कारवाया

उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद पोलीसांनी काल गुरुवार दि. 22 जुलै रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 17 कारवाया करुन या कारवायांतील 107 लि. गावठी दारु, 93 देशी दारुच्या बाटल्या व 20 लि. ताडी मादक पदार्थ जप्त करुन 17 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 17 गुन्हे नोंदवले आहेत.

1) अवैध मद्य विक्रीच्या माहीतीवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने पो.ठा. हद्दीत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत बालाजी जमादार, रा. कराळी हे आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. दुसऱ्या घटनेत संतोष जोगदंड, रा. तुरोरी हे आपल्या राहत्या घरासमोर 20 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. तीसऱ्या सटनेत रियाज शेख, रा. उमरगा हे उमरगा येथे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

2) कालिदास शिखरे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद हे सकनेवाडी शिवारातील जगदंबा हॉटेलमागे देशी दारुच्या 14 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले तर तानाजी रसाळ, रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद हे 10 लि. गावठी दारु बाळगलेले उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) छायाप्पा माने, रा. नांदगाव, ता. तुळजापूर व कैलास राठोड, रा. वत्सलानगर, अणदुर हे दोघे आपापल्या राहत्या घरासमोर एकत्रीतपने 14 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) मंगेश मोटे, रा. गिरवली, ता. भुम व शहाजी विधाते, रा. पिंपळवाडी, ता. वाशी हे दोघे आपापल्या राहत्या घरासमोर अनुक्रमे देशी दारुच्या 14 बॉटल व 4 बॉटल अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

5) शाहुराज सोनवणे, रा. नागुर, ता. लोहारा हे आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 14 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले तर लक्ष्मण कल्यामोळ, रा. लोहारा हे आपल्या राहत्या परिसरात 20 लि. ताडी अंमलीपदार्थ बाळगलेले लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

6) विक्रम पवार, रा. चौगुले वस्ती, लमाण तांडा, तुगांव हे राहत्या वस्तीवर 9 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

7) नानासाहेब वाघमारे, रा. उळुप, ता. भुम हे उळुप फाटा येथे देशी दारुच्या 10 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

8) संतोष समिंदर, रा. आंबी हे आपल्या राहत्या घराजवळ देशी दारुच्या 12 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

9) मालन पवार, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले उस्मानाबाद (श) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

10) दत्ता ओव्हाळ, रा. वानेवाडी, ता. उस्मानाबाद हे तेर- हिंगळजवाडी रस्त्यालगतच्या येडेश्वरी ढाब्यामागे देशी दारुच्या 14 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

11) दशरथ माने, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर हे तुळजापूर- उस्मानाबाद रस्त्यालगत देशी दारुच्या 11 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top