पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

0
पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल
 
उस्मानाबाद,दि.06 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दिनांक 09 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली होती.


राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता ही परीक्षा दि. 09 ऑगस्ट 2021 ऐवजी 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल, संबंधित परीक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अरविंद मोहरे यांनी केले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top